अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा संकल्प, रिक्षा चालकांना मदत मिळवून देणार

Maharashtra Today

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘ठाकरे’ सरकारने मोठा निर्णय घेत राज्यात कडक निर्बंध घातले आहे. कडक निर्बंधामुळे दीड महिन्यांपासून राज्यातील उद्योग-व्यवसाय ठप्प पडले आहे. अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. ही मदत मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक असल्याने अनेक रिक्षाचालकांना आद्यपही मदत मिळू शकलेली नाही.

त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेने रिक्षाचालकांना मदत मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र सरकाने रिक्षा चालकांना जाहीर केलेली १५००/- रुपये प्रति व्यक्ती इतकी रक्कम मिळणार आहे, तरी अद्याप ती रक्कम अनेक रिक्षाचालकांना मिळालेली नाही, त्या रिक्षा चालकांना त्यांचे पैसे रितसर ऑनलाईन अर्ज भरून ती मदत मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित आजपासून संकल्प केला आहे. ‘एक हात मदतीचा’ या सकल्पनेतुन मनसेने आजपासून हा उपक्रम हाती घेतला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button