निलेश लंकेविरोधात मनसे आक्रमक, बेकायदेशीर नोटिसीला मनसेनेचे कायदेशीर उत्तर

Maharashtra Today

मुंबई : पारनेर येथील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर (Social Media)बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. अविनाश पवार(Avinash Pawar) असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च ५ हजार असे एकूण १ कोटी ५ हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती.

मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. निलेश लंके यांच्या नोटीसला आता मनसेने देखील कायदेशीर उत्तर दिलं आहे. निलेश लंकेंच्या ४ पानांच्या नोटीशीला मनसेने १० पानांच्या नोटीशीने उत्तर दिल्याची माहिती मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. बेकायदेशीर नोटीसला कायदेशीर उत्तर दिल्याचं ट्विट अखिल चित्रे यांनी केलं आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button