मनसेची मनपा निवडणुकीसाठी आघाडी? राज ठाकरेंनी केली गर्जना …

Raj Thackeray

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकींबाबत मनसे (MNS) स्वबळावर लढणार. मनसेचा स्वतःचा कार्यक्रम असेल, अशी घोषणा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.

एक मुलाखतीत ते म्हणाले की, मनसेची महापालिकेपर्यंतची वाटचाल ही पक्ष म्हणून असेल. हा मला पत्र पाठवतोय का? तो मला डोळा मारतोय का? यावर माझी वाटचाल अवलंबून नसेल. निवडणुका जेव्हा होतील तेव्हा बघू.

राज ठाकरे पुढे म्हणालेत की, मी उत्तर टाळत नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन कधी संपणार हे माहीत नाही. उद्या कोरोनाची (Corona) तिसरी लाट आली तर पुन्हा लॉकडाऊन (Lockdown). सध्या आपल्या हातात काहीच नाही. अशा परिस्थितीत दीर्घकालीन विषयांवर बोलणे उचित ठरणार नाही. पण एक मात्र नक्की की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसे पक्ष म्हणून १०० टक्के ताकदीने उतरणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button