मनसेचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, मुख्यमंत्र्यांना करवून दिली जुनी आठवण

Raj Thackeray-CM Uddhav Thackeray

मुंबई : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून पूरामुळे पिकं वाहून गेली आहेत, घरं कोसळली आहे, हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विरोधकांकडून सातत्याने ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) दबाव टाकण्याचं काम सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही (MNS) ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ पोस्ट करून शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती केली आहे. या व्हिडीओत सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर भेटीगाठी करताना दिसत होते, त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजारांची मदत करा अशी मागणी केली होती, शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी कागदी घोडे नाचवण्याआधी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी आग्रही मागणी केली होती.

मात्र काळ बदलला, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांनी जनभावना लक्षात घेऊन बांधावरची स्थिती बघितल्याबद्दल तुमचे आभार. सोबत तुमचाच १ व्हिडीओ पोस्ट करीत आहे. तुम्ही स्वतः च मागणी केल्याप्रमाणे सरसकट २५ हजार हेक्टरी द्यावे व स्वतःच केलेली मागणी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं त्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER