मनसेचा मोठा निर्णय; अमित ठाकरेंच्या खांद्यावर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी?

Amit-Thackeray

मुंबई :- राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेत अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधला. यावेळी राज्याच्या प्रत्येक भागातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व नेत्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.

‘मनसे’कडून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रासाठी सरचिटणीस आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती तयार केली जाणार आहे. या सगळ्या समित्यांचा कारभार हाताळण्याची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मनसेची आणखी एक बैठक होणार आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER