एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा गोंधळ ; दोघे पोलिसांच्या ताब्यात

mns-workers-ruckus-at-eknath-shinde-program-in-vasai

वसई : शिवसेनेचे (Shivsena) दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वसईतील कार्यक्रमात मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती आहे .आयुक्तसाहेब वेळ द्या, आयुक्तसाहेब वेळ द्या, अशा घोषणा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या.

त्यानंतर वसई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातच राडा केला. पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना बेदम चोप देत कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे वसईत आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER