बलात्काराच्या आरोपाखाली मनसे कार्यकर्त्याला अटक

mns-worker arrested

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सतीश वैद्य असं या कार्यकर्त्याचं नाव असून टिळकनगर पोलिसांनी बलात्कार, हिंसाचार आणि धमकावल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली . मनसे पक्षातील महिला कार्यकर्त्याने सतीश वैद्य याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

माहितीनुसार , सतीश वैद्य याने आपल्याला ठाणे येथील एका हॉटेलमध्ये जेवण्याच्या बहाण्यानं नेलं आणि तिथे नेऊन बलात्कार केल्याचा पीडित महिलेने आरोप केला . इतकेच नाही तर जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पतीला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगू, अशी धमकी देत आपल्याला ब्लॅकमेल केल्याचंही महिलेने आरोपात सांगितलं आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी सतीश वैद्य याला अटक केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे .