मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मटका अड्डा केला उद्ध्वस्त

MNS women activists demolish Matka Adda

सांगली : जिल्ह्यातील तासगाव येथे एका घरात घुसून मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी तिथे सुरू असलेला मटक्याचा अड्डा (Matka Adda) उद्ध्वस्त केला.

तासगावमध्ये एका घरात मटका सुरू असल्याची पोलिसात तक्रार करूनदेखील पोलिसांनी कारवाई केली नाही. ही माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या (MNS) महिला कार्यकर्त्यांनी मटका अड्डा उद्ध्वस्त केला, असे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

हा अड्डा तासगाव शहरातील सोमवार पेठेत सुरू होता. मनसेच्या तासगाव महिला आघाडीने उद्ध्वस्त केला. मटका घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. शहरात आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मटका सुरू असून तो बंद करा, अशी मागणी मनसेच्या दीपाली पुडकर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आणि तासगाव उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेडगे यांच्याकडे केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER