मनसे स्वबळावरच चालणार – बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar

मुंबई :- मनसेच्या झेंड्याचा रंग बदलण्यापासून मनसे भाजपासोबत येईल अशा चर्चा सुरू आहेत, पण मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की मनसे भाजपासोबत जाणार नाही.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की मनसे राजकारणात स्वबळावर काम करत राहील. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली. राजकारणात एकटी पडलेली मनसे भाजपासोबत जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस आणि राज ठाकरे याची भेट झाल्यानंतर भाजपा आणि मनसे सोबत येण्याची शक्यता वाढल्याची चर्चा होती पण आज बाळा नांदगावकर यांनी असे काहीही होणार नाही, असे सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मनसेची भविष्यातील वाटचाल कळेल.