भाजपच्या गडात मनसेची ताकद वाढवणार ; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसैनिक आक्रमक

Raj Thackeray

मुंबई :- भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर (Nagpur) जिल्ह्यात 130 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार नागपूर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, अशी माहिती मनेचे नेते हेमंत गडकरी (Hemant Gadkari) यांनी सांगितले. त्यामुळे 18 जानेवारीला माणसे कुणाला पछाडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), भाजप (BJP), वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ (VBA) आता मनसेनेही (MNS) ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर…; मनसेच्या आमदाराचे ठाकरे सरकारला पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER