मनसे उंच भरारी घेणार ; इनकमिंग वाढले

मनसे उंच भरारी घेणार ; इनकमिंग वाढले

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मागच्या निवडणुकीत एकमेव आमदार दिला असला तरी. त्यानंतर मनसेचे राजकीय पाऊल यशाच्या वाटेवर आहे. राज ठाकरे या नावाचा दरारा आजही कायम आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूस आपली समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंऐवजी (CM Uddhav Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचेच दार ठोठावताना राज्याने पाहिले आहे.

मनसे राजकीय क्षेत्रात उंच भरारी घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणून मनसेची ओळख आहे.

मनसेत मागील काही दिवसांत जोरदार इनकमिंग वाढले आहे. आळंदी शहरात नुकतेच कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

रविवारी 4 ऑक्टोबरला आळंदी शहर मनसे जनसंपर्क कार्यालय याठिकाणी कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला. या सर्व कार्यकर्त्यांचे मनसे मध्ये सहर्ष स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष समीर भाऊ थिगळे व उपजिल्हाध्यक्ष मनोज खराबी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला.

तसेच, तसेच राजगुरुनगर एमेसिबी ऑफिस फोडल्याप्रकरणी मनसेचे तीन वाघ नितीनजी ताटे मंगेशजी सावंत सोपान ठोंबरे यांचाही आळंदी शहर मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला. अशी माहिती आळंदी मनसे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सुरेश तापकीर यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER