लोकल झाली, आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनसे राज्यभर आंदोलन करणार

Maratha community-mns

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाने हाहाःकार केला आहे तर दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. त्यातच राज्यसरकारच्या अनेक धोरणांवर प्रश्नचिन्ह ऊभं करून मनसेने आंदोलनांचा जणू विडाच उचलला आहे. ठाकरे सरकार (Thackeray Govt) सत्तेत आल्यानंतर मनसेने (MNS) राजकारणात आक्रमक भूमिका घेत लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा बडगाच ऊभारलेला दिसतो.

नुकतेच मनसेने मुंबई लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेबंग करून मनसे नेत्याने लोकलमधून प्रवास केला.
त्यानंतर आता मनसे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. त्यातच मनसेने लोकल सुरू करण्याच्या मागणीनंतर मराठा समाज्याचा बाजूने आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनसे मैदानात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रेंनी दिला आहे. सोलापूर जिल्हा बंद आंदोलनात मनसे सक्रिय सहभाग घेतला आहे. पण जर आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर मनसे आक्रमक आंदोलन करणार असा इशारा मनसेने दिला आहे.

दरम्यान, मराठा समाज आरक्षणासाठी पेटून उठला असून जागोजागी आंदोलन करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER