पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेचा विजय निश्चित, रुपाली पाटील यांना विश्वास

Rupali Thombre Patil

पुणे : आज झालेल्या मतदानात मी नक्की विजयी होईन, असा विश्वास मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी व्यक्त केला. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, कोणाची सोया लावण्यासाठी म्हणून मनसेने ही निवडणूक लढवलेली नाही. कोणाचेही नाव न घेता त्या म्हणाल्या की, कोणाचे उमेदवार साखर कारखानदार आहेत तर कुणाचे शिक्षण सम्राट. त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांशी काही घेणे – देणे नाही. पक्षाने मला पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारी दिली आहे. प्रचारात मला मतदारांचा जो पाठिंबा मिळाला त्यावरून माझा विजय निश्चित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER