मनसेचा मोठा निर्णय, मराठवाड्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार

Raj Thackeray

औरंगाबाद :- ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेला संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठवाड्यात तयारीला लागली आहे. राज्यात 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मराठवाड्यात जवळपास 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या सर्वच निवडणुका लढवणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.

शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले असून, राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर पोहोचण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. गाव पातळीर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मनसेला ग्रामीण भागातील एन्ट्रीचा फायदा होणार की त्यांच्या एन्ट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, हे 18 जानेवारीला समजेल.

राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त मनसेकडे असणारे सुशिक्षित तरुण या मनसेच्या पॅनेलकडून निवडून येतील आणि गावाचा विकास करतील, अशी माहिती सुमित खांबेकर यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : पक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरले पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा सल्ला  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER