‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार

Raj Thackeray-Mumbai Dabewala-CM Thackeray

मुंबई : करोना (Corona)साथीच्या आजारामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंआहे. त्यातच लोकलमधून प्रवासाची परवानगी नसल्यानं मुंबईतील डबेवाल्यांना आर्थिक प्रश्नांसह अनेक समस्यांना सामोर जावं लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात होती. अखेर ऑक्टोबरमध्ये डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले आहेत. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील उपनगरी रेल्वेवर पडणारा ताण लक्षात घेऊन उपनगरी गाडय़ांची संख्या वाढविण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले आहे. तसेच येत्या ५ तारखेपासून मुंबईतील डबेवाल्यांना ‘क्यूआर कोड’ (QR Code)च्या माध्यमातून या गाडय़ांतून प्रवासाची परवानगी ‘ठाकरे’ सरकारने (Thackeray Govt) दिली आहे.

ठाकरे सरकारकडून डबेवाल्यांना परवानगी देण्याच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वागत केलं आहे. २४ सप्टेंबर रोजी न्यायाच्या अपेक्षेने डबेवाल्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती आणि आपली व्यथा मांडली. राज यांनी योग्य पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देतो असं आश्वासन दिलं आणि आजच्या ‘अनलॉक’ च्या नियमावलीत डबेवाल्याना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली,’ असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुनश्च हरिओम म्हणणाऱ्या राज्य सरकारला नोकरदारांना घरचं जेवण वेळेत पोहचवणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्यावी असं वाटलं नाही, शेवटी ह्या बांधवानी राजसाहेबांची भेट घेऊन व्यथा मांडली आणि आज डबेवाल्याना रेल्वेने प्रवासाची मुभा दिली. ‘न्याय कृष्णकुंजवर मिळतो’ अशी पोस्टही मनसेने केली आहे.

ही बातमी पण वाचा : बाबरी पाडली कोणी? त्याचे उत्तर शिवसेनाप्रमुखांनी केव्हाच दिले होते – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER