परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम, राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता

Raj Thackeray-Electricity Bill

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीजबिलाविरोधात राज्यात राजकारण तापलेलं आहे. राज्य सरकारने नागरिकांचे वाढीव वीजबिल (Electricity Bill) माफ करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुंबईमध्ये आज मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परंतु कितीही दबावतंत्र वापरले तरी मनसेचा मोर्चा (MNS Morcha) होणारच अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे. विशेष म्हणजे आजच्या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)हेही सहभागी होण्याची शक्यता आहे.

वाढीव वीजबिलाविरोधात मोर्चासाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. मनसेकडून शहरात ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. विषेश म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या परिसरातदेखील बॅनर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समद्ये वीजबिल न आलेल्या मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

या मोर्चाबद्दल विचारले असता, वाढीव वीजबिलाविरोधात आयोजित करण्यात आलेला मनसेचा आजचा मोर्चा कुठल्याही परिस्थितीत निघणारच. कितीही दबाबवतंत्र वापारले तरी हा मोर्चा होणारच. मनसेच्या मोर्चाबाबत नेत्यांमध्ये कसलाही संभ्रम नाही, अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : आरक्षण : संयम ठेवला, अन्याय सहन करणार नाही; मराठा समाजाचा ठाकरे सरकारला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER