मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

MNS - Bhagirath Bhalke - Maharastra Today
MNS - Bhagirath Bhalke - Maharastra Today

मुंबई : सोलापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले . आता भगीरथ भालके याना मनसेचा पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या प्रचारासाठी उतरणार आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सचिव दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी यासंदर्भात माहिती दिली .

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चितबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष लागले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button