लॉक डाऊन मध्ये मनसेचे मदत कार्य

MNS Suhas Dashrathe

औरंगाबाद : कोरोना मुळे संपूर्ण देशात २१ दिवस लॉक डाऊन करण्यात आले आहे. संचार बंदीमुळे शहरातील अनेक भागातील वयोवृध्द, अपंग नागरिक तसेच बाहेर गावहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला, तसेच दिवसभर मोल मजुरी करून खाणाऱ्या अनेक कुटुंबांचा रोजी रोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्य गरजूंच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्प लाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये आज पहिल्याच दिवशी शहराच्या विविध भागातून वयोवृध्द व अपंग नागरिक,बाहेर गावहून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी यांचे जेवणाच्या व्यवस्था करता हेल्प लाईनला फोन आले व लगेचच त्यानुसार त्या प्रत्येकाला भूक भागवण्यासाठी जेवणाचे डब्बे घरपोच देण्यात आले, असे एकूण ५६ लोकांना पहिल्याच दिवशी जेवणाचे डब्बे देण्यात आले.

तसेच या हेल्प लाईन मध्ये अनेकांनी मेडीसिनच्या मागणी करता देेखील फोन केलेत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या व औषधांची चिठ्ठी अशा १२ गरजूंनी मनसे हेल्प लाईनच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार त्यांना लगेचच हेल्प लाईन च्या माध्यमातून मोफत घरपोच औषधी पुरवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा संघटक वैभव मिटकर,उपाध्यक्ष गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर,राहुल पाटील,संकेत शेटे,विशाल आमराव, वंदे मातरम् सेनेचे समीर लोखंडे, संदीप कुलकर्णी,अमित दायमा,विशाल कारभारे,कास्तुभ भाले,आशुतोष राजकडे,कमलेश राजकडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.