जाणाऱ्या ‘त्या’ ३२० पदाधिकाऱ्यांना रोखण्यात मनसेला यश

MNS Raj Thackeray

कल्याण : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. केडीएमसीचे मनसे (MNS) गटनेते मंदार हळबे भाजपात (BJP) गेलेत. या आधी गेल्या आठवड्यात कल्याणमधील मनसेच्या ३२० पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची बातमी जोरात होती. मात्र, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संयमाने कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थिती हाताळली. ‘त्या’ ३२० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे परत घेण्याचा निर्णय घेतला.

मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला. त्यांना पक्षाने कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद दिले. गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अनंता गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही माजी नगरसेवक मनसेच्या वाटेवर असून त्यांना पुन्हा पक्षातर्फे मोठी जबाबदारी देऊन निष्ठावंतांना डावलण्याची त्यांना शंका वाटत होती. त्यामुळे ३२० पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

राजू पाटील (Raju Patil) यांनी पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. सोमवारी ( १ फेब्रुवारी) संध्याकाळी सर्व पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार राजू पाटील यांच्या उपस्थित वांद्रे येथील मिग क्लबमध्ये चर्चा झाली. या चर्चेत पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले आणि त्यांनी आपले राजीनामे परत घेण्याचा निर्णय घेतला. मनसेवरचा मोठा धोका टळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER