मनसे गोरगरिबांसाठी सरसावली; दोन हजारांहून अधिक नागरिकांना केली मदत

MNS - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आहे. या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे (Corona) हातावरचे पोट असणाऱ्यांचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे.  कोणाची नोकरी गेली तर कोणाच्या हाती रोजीरोटी नाही. त्यामुळे अशा गरजू आणि गोरगरीब नागरिकांसाठी ठाणे शहर मनसे धावून आली आहे.

त्यानुसार रिक्षाचालक, रिक्षाचालक महिला, घरकाम करणाऱ्या महिला, तृतीय पंथी आदींसह झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी  १३ मेपासून मनसेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावतीने मोफत अन्नधान्याचे किट वापट केले जात आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. खासकरून रिक्षाचालक, नोकरदार वर्ग, घरकाम करणाऱ्या  महिलांसह झोपडपट्टी भागातील नागरिकांना किराणा सामान घेण्यासही हाती पैसा नाही. या गरजूंच्या मदतीसाठी मनसेने पुढाकार घेतला आहे.

मनसेतर्फे वाटप करण्यात येणाऱ्या किटमध्ये तीन ते पाच किलो तांदूळ, तीन किलो गहू किंवा पीठ, अर्धा अर्धा किलो कडधान्य, डाळी, एक किलो साखर, मसाल्याची पाकिटे, चहा पावडर, एक एक किलो कांदे-बटाटे, मीठ, तेल आदी साहित्य दिले गेले आहे.

ही बातमी पण वाचा : नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला राज्याचे भविष्य दिसत नाही; मनसेची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button