मनसेची नवी रणनीती, नवी मुंबई-ठाण्यात करणार पक्षविस्तार

मुंबई :– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्दापन दिन यंदा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचा बदललेला झेंडा आणि अजेंडामुळे हा वर्धापन दिन महत्त्वाचा मानला जात आहे. ठाणे, नवी मुंबईत मनसेचा विस्तार होणार असल्याने वर्धापन दिनासाठी नवी मुंबई ठरवले असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे मनसेने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच, नवी मुंबईत पक्षवाढीसाठी वर्धापन दिन नवी मुंबईत घेण्यात आला आहे. या नव्या बदलाची सुरुवात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमापासून होणार असून येत्या मराठी भाषा दिनी ठाण्यात कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष म्हणजे फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातच नव्हे तर राज्यभरात मनसेचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठक