मनसेचा पुढाकार ; कोविड वॉर रुमद्वारे कोरोनाबाधितांना मदतीचा हात

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona)संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, रुग्णवाहिका, औषधे आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.या साठी नेमकी कोणाला आणि कुठे विचारपूस करावी हे देखील लवकर समजत नाही. नागरिकांना उद्भवणाऱ्या या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS)पुढाकार घेतला आहे.

मनसेने मुलुंड येथील नागरिकांसाठी 24 तास सेवा देणारे मनसे कोविड वॉर(Covid War Room) रूम उभारली आहे.

मनसेनेतर्फे मुलुंडच्या केशव पाडामध्ये ही वॉररुम उभारण्यात आली आहे. या वॉररुमचे मोबाईल नंबर समाजमाध्यम आणि फ्लेक्स बोर्डद्वारे नागरिकांमध्ये पोहचविण्यात आले आहेत. या वॉररुम मधून रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन ची व्यवस्था करून देणे, औषधे कुठे मिळतील याची माहिती देणे गृह विलगीकरणामध्ये असलेल्या कुटुंबाना मोफत जेवणाची व्यवस्था करुन देणे, अशा विविध सोयी कोरोनाबाधितांना उपलब्ध करून दिल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button