‘आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते’, मकर संक्रांतीनिमित्त मनसेचा नारा

MNS-RAJ THACKERAY

पुणे : भगव्या रंगाचे तिळगुळ वाटप करून “केशरी रंगाचा नवा हिंदुस्तान, तिळगुळा संगे वाढवू महाराष्ट्र धर्माची शान”, ‘आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत’ असा नारा पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरवासीयांना शुभेच्छा देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आणि नंतर विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेला हवं तसं यश प्राप्त झालं नाही. पुण्यात कोथरुड सारख्या जागेवर भाजप विरोधात आघाडीने मनसेला पाठिंबा दिला. पण निकालानंतर मनसे महाविकास आघाडीसोबत गेली नाही. त्यामुळे तीन पक्षाच्या सरकारबद्दल राज ठाकरे यांची भूमिका काय याची उत्सुकता मनसैनिकांसह सर्वांनाच लागली होती.

दरम्यान, पुण्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचं दोन दिवसांचं ‘संवाद शिबीर’ घेतलं. त्यामध्ये 23 जानेवारीला महाधिवेशन घेण्याची घोषणा केली. यानंतर मनसैनिक पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. आज भगवे तिळगुळ वाटत, मनसेन शिवसेने हिंदुत्वाचा मुद्दा मागे टाकला असला तरी आम्ही सुरवातीपासून हिंदुत्ववादी होतो आणि राहणार असंआत्मविश्वासाने सांगण्यात आले.

फेकाडासामनेवाल्याने’ राजेंकडून नवीकोरी गाडी घेतली होती, मनसेने राऊतांचे कान टोचले