टेस्लाची महाराष्ट्राऐवजी कर्नाटकला पसंती, बंगळुरुत नोंदणी ; मनसेची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. राज्याचे पर्यावर्ण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी टेस्लाच्या टीमसोबत 22 ऑक्टोबर 2020 रोजी प्राथमिक चर्चाही केली होती.परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली. त्यानंतर आता मनसेने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER