ठाण्यात मनसेला धक्का; प्रलय साटेलकर यांचा राजीनामा

अविनाश जाधव यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप

Prayla Satelkar

ठाणे :- ठाणे मनसे म्हणजे अविनाश जाधव (Avinash Jadhav) असे समीकरण झाले आहे, या शब्दांत अशी टीका करत ओवळा माजिवडा उपविभाग अध्यक्ष प्रलय साटेलकर (Pralay Satelkar) यांनी राजीनामा दिला.

साटेलकर म्हणाले – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देतो आहे. त्यांनी आरोप केला – तळागाळातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही. त्यांना कोणती जबाबदारी दिली जात नाही. राज ठाकरेंवर (Raj Thackeray) नाराज नाही. गेले अनेक दिवस पक्षात घुसमट होत होती. शेवटी कंटाळून शनिवारी राजीनामा दिला.

याआधी मनसेचे डॉ. ओंकार माळी आणि अनिल म्हात्रे या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. आता साटेलकर यांनी राजीनामा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER