मोदींच्या भेटीवरून मनसेचा उद्धव ठाकरेंना टोमणा; पंतप्रधानपद… !

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi - Sandeep Deshpande

मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. जागावाटपावेळी तसे ठरल्याचे शिवसेना सांगत होती. या वादात भाजपा (BJP)- शिवसेनेची (Shiv Sena) युती तुटली होती. यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात झालेल्या भेटीवर टोमणा मारला – आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच – अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आताच सांगा, नंतर कटकट नको!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी नवी दिल्लीत अजित पवार (Ajit Pawar)आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर, अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेवरून विविध तर्क- वितर्कांबरोबरच विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे. मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही असाच चिमटा काढला आहे. ट्विट केले – आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच – अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आताच सांगा नंतर कटकट नको!

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button