काय मग मुंबईकर पुन्हा शिवसेना? नाही आता फक्त मनसे

Raj And Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने (Monsoon) प्रवेश केला असून, पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली. यंदा मुंबई तुंबणार नाही अशी ग्वाही शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तर मुंबईत नालेसफाईचे काम १०४ टक्के पूर्ण झाल्याचा दावाही महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने केला होता. मात्र पहिल्या पावसातच शिवसेनेचा हा दावा फोल ठरला. पहिल्या पावसातच मुंबई शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते.

नाल्यालगतच्या अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने स्थानिकांची राहण्यासाठी इतरत्र सोय करावी लागली होती. तर गुरुवारी भांडूप येथे दोन महिला मॅनहोलमध्ये पडताना वाचल्या. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. आणि यावरून महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘माझी गटार माझी जबाबदारी’ असं कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. तसेच ‘मग काय मुंबईकर पुन्हा शिवसेना? नाही आता फक्त मनसे’ असे म्हणत एक दुसरा व्हिडीओ देशपांडे यांनी शेअर केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button