फेकाडासामनेवाल्याने’ राजेंकडून नवीकोरी गाडी घेतली होती, मनसेने राऊतांचे कान टोचले

Sandeep Deshpande-Sanjay Raut

मुंबई :- आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्यात्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मात्र मी दाऊदला पाहिले आहे. मी त्याला पाहिलंय, त्याच्याशी बोललोल. एकवेळ त्याला दमसुद्धा दिला होता, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर मनसेने त्यांचे कान टोचले आहेत. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो, असं ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर मनसैनिकांनी आपली गाडी जाळल्याचं संजय राऊतांनी सांगितल्यावर, आमच्या राज ठाकरेंकडून तुम्ही नवीकोरी गाडी घेतली होतीत, अशी आठवणही देशपांडेंनी करुन दिली.

‘मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो आणि त्याला 9/11 नंतर दम पण दिला होता. आणि हो, ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या “दिलदार राजाकडून” तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती’ असा जळजळीत टोलाही संदीप देशपांडेंनी राऊतांना लगावला आहे. विशेष म्हणजे त्यापुढे ‘फेकाडासामनेवाला’ असा हॅशटॅग टाकून देशपांडेंनी हिणवलंही आहे.

महागाईची ‘संक्रांत’ आपल्यावरच उलटू शकते, शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल