‘आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही’, नामांतरणावरून मनसेचा सेनेवर हल्लाबोल

Shivsena-mns

मुंबई :- शिवसेनेने (Shivsena) औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून (Congress) त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते. तर आता या मुद्द्यावरून मनसेनेही (MNS) शिवसेनेची कोंडी केली आहे. अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा, असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे. तसेच आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरताना संदीप देशपांडे म्हणाले की, आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा. तसेच २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करा, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळे त्यांना केवळ अग्रलेख लिहिता येते, मात्र त्यांना कृती करणे जमत नाही, असा खरमरीत टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : मनसे कार्यकर्ते माजी आमदार वसंत गितेंच्या पार्टीला, पक्षात घेण्यास उत्सुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER