घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी ; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

Sandeep Deshpande and Aditya Thackeray

मुंबई : मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे . त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले . यापार्श्वभूमीवर एक व्हिडीओ ट्विट करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावला .

ही बातमी पण वाचा:- आशालता वाबगावकरांच्या निधनानंतर मनसे संतापली; मालिकांचे चित्रीकरणच बंद करण्याचा दिला इशारा

‘केम छो वरळी’, असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यातून त्यांनी पालिकेच्या कामावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

दरम्यान वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आले आहे . मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परळ, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER