‘मुंबई मॉडेलच कौतुक करणारे तोंडावर आपटले’, मनसेचा शिवसेनेला खोचक टोला

Sandeep Deshpande-uddhav thackeray

मुंबई : राज्यात करोना (Corona virus) लाटेचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने (Thackeray Govt) ४ जूनच्या मध्यरात्री आदेश जारी करत सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती दिली. सोमवारपासून राज्यातील १८ जिल्हे पूर्णपणे अनलॉक होणार आहेत. मात्र या १८ जिल्ह्यात मुंबईचा समावेश नाही. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर तिसऱ्या गटात येत असल्याचे आज महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, कोरोना परिस्थिती हाताळण्यात मुंबई महापालिका अव्वलस्थानी असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकदा सांगत असतात. देशात कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईच मॉडेल दिशा देणारे ठरले आहे, असेही ते अनेकदा म्हणाले होते. मात्र महाराष्ट्रातील अनलॉक प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या टप्प्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत निशाणा साधला. ‘मुंबई मॉडेल च कौतुक करणारे तोंडावर आपटले आहेत. जर मुंबई मॉडेल यशस्वी होते तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?’ असा खोचक प्रश्न उपस्थित करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांवर मिस्कील टीका केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button