मनसेने उघड केला बीकेसी कोविड सेंटरचा भोंगळ कारभार, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

मुंबई : कोरोनाच्या (Corona Virus) वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यभरात कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबईतही अश्यापराकारचे अनेक कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आज पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला.

मुंबईतील बीकेसी कोविड सेंटरमधील असाच एक प्रकार त्यांनी उघडकीस आणला. रूग्णाला वेळेवर औषध दिले जात नाहीत. रूग्णाला ऑक्सिजनची गरज असतानाही ते दिले जात नाहीत. विशेष म्हणजे या रूग्णांवर दातांच्या डॉक्टरांकडून उपचार केले जात असल्याचा पुरावा त्यांनी सादर केला. या कोविडसेंटरच्या माध्यमातून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button