
मुंबई: मुंबईत समुद्रातील पाण्यावर प्रक्रिया करून खारं पाणी गोड करून मुंबईकरांना पुरवण्याचाप्रस्ताव शिवसेनेने (Shivsena) योजला आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेने विरोध दर्शवला आहे.
समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग आहे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे.
खार पाणी गोड करायचं आहे की स्वतःच उखळ पांढर करायचं आहे? विरप्पन गॅंग चा लुटीचा नवा मार्ग
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 10, 2021
समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचा आहे?, असा सवाल करत हा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
मुंबई शहरात मोठ्या पडलेल्या पावसाचं पाणी अडवण्याचा रेनवॉटर प्रकल्प बंद पडलेला असताना आता नवा विरप्पन गँगने लुटीचा नवा मार्ग शोधलाय. नव्या मार्गानुसार आता समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रस्ताव विरप्पन गँगने ठेवलाय. मात्र मनसेचा या प्रस्तावाला कडाडून विरोध असेल, असं देशपांडे यांनी सांगितलं.
तसेच, ज्या कंपणीला काम दिलं आहे ते सुद्धा चुकीचं आहे, असं सांगत मुंबई महापालिकेत विरप्पन गँग फक्त लूट करत आहे. येणाऱ्या काळात मुंबईकरांची ही लूट थांबवण्यासाठी मनसे विरप्पन गँगच्या विरोधात पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरणार असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला