रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचे यश, अशी दुटप्पी भूमिका का? मनसेचा सवाल

RAj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 कोरोना (Corona) रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारीपासून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र यावरुन मनसेने (MNS)राज्य सरकारवर निशाणा साधला . महाराष्ट्रातील रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.

आज महाराष्ट्रातील (Maharashtra) रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजेच रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश. अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात??? असा सवाल संदीप देशपांडेंनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button