‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्री लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत – संदीप देशपांडे

CM Uddhav Thackeray-Sandeep Deshpande

मुंबई : राज्यातील मंदिरे उघडी करण्याच्या मागणीसाठी भाजप, वंचित,एम आय एम नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने लवकरात लवकर नियमावली जाहीर करून मंदिरे सुरू केली नाही तर आम्ही सरकारचा आदेश झुगारून मंदीरांमध्ये प्रवेश करु असा कडक इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून दिला होता .

दैनंदिन व्यवहारात सरकार सुट देत असताना सरकारने मंदीरंच का बंद ठेवली आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर आता, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील ट्विट करून या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावर खोचक टीका केला आहे.

संदीप देशपांडे यांनी, ‘पहले मंदिर फिर सरकार’ ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक’ म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ ??” असा खोचक सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना व सामनावर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER