पांडुरंग रायकरच्या मृत्यूला मुख्यमंत्री ठाकरेच जबाबदार; मनसेचे संदीप देशपांडेंचा आरोप

मुंबई : एका वृत्त वाहिनीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेच जबाबदार आहेत, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला. मुख्यमंत्र्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी त्या पदावर राहू नये, असा टोमणा त्यानी मारला.

ही बातमी पण वाचा:- मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हीच पांडुरंग रायकर यांना खरी श्रद्धांजली – नितेश राणे

देशपांडे म्हणाले की – यंत्रणा तुम्ही नीट चालवत नाहीत. यंत्रणा नीट चालते की नाही, याची माहिती घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे. त्यांना ती जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये. घरी बसवण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलेले नाही.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठीच मुख्यमंत्री बाहेर येणार का? लोकांचे दुःख जाणून घ्यायला कधी रस्त्यावर उतरणार?, असे प्रश्नही संदीप देशपांडे यांनी केले. रुग्णाला योग्य उपचार न मिळणे, हे राज्य सरकारचं अपयश आहे. कुणाच्याही नशिबी हे येणे ही दुदैवी घटना आहे. तुम्ही एखाद्या पत्रकाराला बेड, रुग्णवाहिका मिळवून देऊ शकत नसाल तर मग तुम्ही लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारत असलेल्या कोव्हिड सेंटरचा उपयोग काय ?, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. रुग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये उपचारच मिळत नसतील तर तिथे फक्त पैसे ओरपण्याचे काम सुरू आहे. तिथे जे रुग्ण बरे होत आहेत, ते राम भरोसे असे देशपाडे म्हणाले.

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूसारख्या हजारो घटना गेल्या ५ महिन्यात घडल्या आहेत. बीकेसी, नेस्को किंवा परवा पुण्यात उद्घाटन झालेले कोव्हिड सेंटर असेल, यात लोकांना उपचार मिळत नसतील तर सरकारला लाज वाटली पाहिजे. मोठी मोठी कंत्राट द्यायची, पण त्याचा काय फायदा?, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER