बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का? मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

Uddhav Thackeray-Raj Thackeray

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अद्यापही लोकल रेल्वे सेवा सुरु केलेली नाही . यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा मनसेने (MNS) ठाकरे सरकला (Thackeray Govt) दिला आहे .

बेस्ट बसमध्ये (BEST Bus) होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .

“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर (Video Share) करत देशपांडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

 

;

ही बातमी पण वाचा : केंद्राकडून वादे, दावे खूप; पण करोना पुढे देश मागे हेच वास्तव : शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER