राज ठाकरेंवरील टीकेबाबत मनसेचे राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

- महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत! फोटो केला ट्विट

Raj Thackeray-Sanjay Raut

मुंबई : मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेऊन काही प्रश्नांची चर्चा केली यावरून शिवसेनेचे संजय राऊत यांनी टीका केली – राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. याच्या उत्तरात मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी संजय राऊत आणि राज्यपाल यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला.

या फोटोत संजय राऊत राज्यपाल (Sanjay Raut) भगतसिंह कोश्यारी यांना वाकून कोपरापासून दंडवत घालताना दिसत आहेत. फोटोला देशपांडेंनी ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ असे बोचरे शीर्षक दिले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपासह राज ठाकरे यांच्यवरही टीका केली. म्हणाले – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. असे असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

याच्या उत्तरात संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांचा उल्लेखित फोटो ट्विट केला आहे. हा फोटो मे महिन्यात महाराष्ट्र कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीवरून महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद निर्माण झाला होता तेव्हाचा आहे. त्यावेळी संजय राऊत यांनी राजभवन म्हणजे फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टीका केली होती. या टीकेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुखावले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संजय राऊत यांनी राज्यपालांना कोपरापासून दंडवत केला होता. भगतसिंह कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणून मी असा नमस्कार केला, असे राऊत म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER