आमचा ‘राजा’ तुमच्या ‘राजा’सारखा खोटं बोलत नाही; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचा टोला

mns-responds-by-sharing-old-video-of-gadkari

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. यावेळी अनेक राजकीय आणि अराजकीय विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीत भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) हे माझ्याकडे तिकीट मागण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर अतुल भातखळकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला. अतुल भातखळकर तोंडावर पडले. ‘आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही.’ असंदेखील संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी भाषणात बोललेलं खरं आहे. कोणता नेता त्यांच्याकडे गेला तर ते फोन करून सांगतात, असं या व्हिडीओमध्ये गडकरी सांगत आहेत. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे.

राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे, असे भातखळकर म्हणाले होते. गौप्यस्फोट करण्याकरिता माझा असा वापर करणे राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले होते. परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. २००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझे राजकीय वजन भरपूर वाढलेले दिसते, असे अतुल भातखळकर म्हणाले. दरम्यान पक्षातील माणसं सोडून जातातच. त्यांचं जाणं-येणं चालूच असतं, माझ्या पक्षातदेखील अनेक जण येण्यास तयार आहेत. मागे एकदा भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. त्याच्यासोबत कोणी तरी लोखंडेदेखील होते. मी गडकरींना फोन करून सांगितले आणि त्यांना परत पाठवले, असे राज ठाकरे म्हणाले होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button