मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; या मुद्यांवरून शिवसेनेला घेरणार

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला हद्दपार करण्यासाठी भाजपने (BJP) रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. तर दुसरीकडे राज्य सरकारमध्ये एकत्र असूनही काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या (Shivsena) विरोधात स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) शिवसेनेविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे. अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भात मनसेने माहिती दिली आहे.

शिवसेनेविरोधात निवडणूक लढण्यासाठी मनसेने उपस्थित केलेले प्रश्न

१. मुंबईतील अतिक्रमणे हटवून फुटपाथ रस्ते फेरीवालेमुक्त झालेले पाहायचे आहेत ?
२. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त झालेले पाहायचे आहेत ?
३. मुंबईत पावसाळ्यात थोड्या थोड्या पावसातसुद्धा पाणी भरणे थांबवायचे आहे ?
४. मुंबईत बेशिस्तपणे होणारे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम थांबवायचे आहे ?
५. मुंबईत होणारी परप्रांतीयांची दादागिरी आणि गर्दी थांबवायची आहे ?
६. मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला त्याची पूर्वीची जागा मिळवून द्यायची आहे ?
७. मुंबईत पुन्हा एकदा मराठी शाळांना त्यांचा दर्जा पुन्हा मिळवून द्यायचा आहे ?
८. मुंबईतील महानगरपालिकेच्या दवाखान्यांचा दर्जा उत्तम होताना पाहायचा आहे ?
९. मुंबईत विकासकामे करताना सौंदर्यदृष्टी आणि निसर्गाचा समतोल राखताना पाहायचा आहे ?
१०. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार थांबवायचा आहे ?

आदी प्रश्न उपस्थित करत हे सर्व शक्य असल्याचे मनसेने म्हटले आहे. पण त्यासाठी मुंबई महानगरपालिकेत फक्त ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हवी! यापुढे मतदान करताना नक्की विचार कराल अशी अपेक्षा मनसेने मुंबईकरांकडून व्यक्त केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button