मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज, आज राज ठाकरेंकडून श्रीगणेशा

महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार असलेले राज ठाकरे आजपासून सुरू होत आहेत

Raj Thackeray

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला (Mumbai Municipal Corporation elections) अवघे काही महिनेच शिल्लक असल्याने सत्ताधारी शिवसेनेसह इतर पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महापालिका निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीसाठी मनसे आता जोमाने उतरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पक्षाची बैठक असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कामाचा श्रीगणेशा करणार असून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, बैठकीपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन अनेक वेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा सेनेवर निशाण साधला. मुंबई महापालिकेला लुटण्यासाठी विरप्पन गँग काम करत आहे. ही विरप्पन गँग महापालिकेला मोठ्याप्रमाणात लूटत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असं म्हणत देशपांडे यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER