ग्रामपंचायत निवडणुकींच्या अधभूतपुर्व निकालानंतर मनसेने दिली प्रतिक्रिया

मुंबई : ग्रामपंचात निवडणुकींचे निकाल (Gram Panchayat elections) काल हाती आले. निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीनेच (Mahavikas Aghadi) बाजी मारल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या संपूर्ण निकालात मनसेनेही आपली ताकद दाखविली आहे . 35 ग्रामपंचायतीमध्ये मनसेने विजयी पताका फडकवलेली आहे. ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेकडूनही (MNS) आता प्रतिक्रिया आली आहे.

मनसेचे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांनी फेसबुकद्वारे निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केले आहे. अनिल शिदोरे म्हणाले की, “ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं. लोकशाहीचं खरं रूप भेटल्याचा आनंद होतो.”

दरम्यान, यवतमाळमध्ये 15 , जिगाव ग्रामपंचायत 7 जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये 6, अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे 7 जागांवर मनसेने बाजी मारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER