टोल दरवाढीवरून मनसे पुन्हा आक्रमक; ‘या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय’

MNS

मुंबई :- टोल दरवाढीवरून मनसेने (MNS) यापूर्वीही मुंबईत अनेक आंदोलनं केली आहेत. लॉकडाऊनमध्ये या बाबींवर पडदा पडलेला होता. आता राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू असून जवळपास बहुतांश व्यवहारदेखील सुरू झाले आहेत. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य वर्गाला आता टोल दरवाढ अधिकची डोकेदुखी ठरत आहे.

मुंबईच्या एन्ट्री पॉइंट्सवर टोलदरात वाढ झाल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक पवित्रा घेत ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन केले. टोल दरामध्ये ५ ते २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ‘या सरकारचं  करायचं काय? खाली डोकं वरती पाय’ अशी घोषणाबाजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ऐरोली टोल नाक्यावर केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

आजपासून (गुरुवार १ ऑक्टोबर) टोलच्या दरात वाढ झाली असून ५ ते २५ रुपयांची वाढ  करण्यात आली आहे. तसेच मासिक पासही महागला आहे. त्यामुळे दररोज मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नाही; मात्र टोलदरात वाढ होत असल्याने वाहनचालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, आंदोलनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणा-या मनसेने टोल दरवाढीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मुंबईच्या टोल नाक्यांवर नवीन दर :

  • छोटी वाहने – ४० रुपये
  • मध्यम अवजड वाहने – ६५ रुपये
  • ट्रक आणि बसेस – १३० रुपये
  • अवजड वाहने – १६० रुपये
  • हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ
  • पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० वर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER