२ एप्रिलला पुण्यात राज गर्जना, राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार

Raj Thackeray

मुंबई : आगामी पुणे महापालिका (Pune Mahanagarpalika) निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सज्ज झाले आहेत. या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी त्यांनी नुकताच नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, आज ते पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता त्याचे आजचे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. येत्या २ एप्रिल रोजी पुण्यात मनसेचा (MNS) मेळावा आयोजित करण्यात आलेला असून, या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करतील.

दरम्यान आज राज ठाकरे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात होता. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीविषयी रणनिती राज ठाकरे आखणार होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER