
मुंबई : पुण्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) कंबर कसली आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी पुण्यातील वरिष्ठ मनसे नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांवर (Municipal elections) चर्चा झाली.
या दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील वरिष्ठ मनसे नेत्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मनसे नेते बाबू वागस्कर आणि अनिल शिदोरे उपस्थित होते. येत्या पुणे महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत एकूण 45 मिनिटे चर्चा झाली.
राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवार होणारी बैठक शुक्रवारी 29 जानेवारीला होईल, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला