राज्याला दूरदृष्टी दाखवणारा एकमेव नेता राज ठाकरे – मनसे

Raj Thackeray

राज ठाकरेंची मागणी सर्वोच्च न्यायालयालाही मान्य.परप्रांतियांबाबत निर्ण देताना सर्वोच्च न्यालयानेही यापूढे परप्रांतियांची नोंद करणे आवश्यक असल्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत.


मुंबई :- लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या लाखो परप्रांतीय मजुरांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला.

सर्व मजुरांना लवकरात लवकर त्यांच्या राज्यात पोहचवा व यापूढे परप्रतियांची नोंद ठेवा असा आदेश न्यालयाने सर्व राज्यांना दिला आहे.

न्यायालयाच्या या आदेशानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या मागणीनंतर परप्रांतियांबाबत सर्वोच्च न्यालयानेही बडगा उगारल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. तसेच, पुन्हा एकदा दूरदृष्टी दाखवणारा एकमेव नेता हे राज ठाकरे आहेत हे सिद्ध झालं असल्याचे मत मनसेने व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : त्या क्षणी राज ठाकरे पहिल्यांदाच झाले होते अत्यंत भावुक…

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश –

ज्या मजुरांना गावी परत जायचे आहे तप्रमाणेच मजुरांना १५ दिवसांत त्यांच्या घरी पाठवा, असा स्पष्ट आदेश देताना सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारना असाही महत्त्वपूर्ण आदेश दिला की सर्व परप्रांतात जाऊन परत आलेल्या मजुरांची नोंदणी राज्य सरकारने करावी. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हीच मागणी केली होती. आज सुप्रीम कोर्टाने ती मान्य केली आणि याबाबत ८ जुलैला पुढील सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास राज्यांना सांगितले.

लॉकडऊन काळात लाखो मजूर त्यांच्या राज्यात परतले. अचानक आलेल्या संकटामुळे संपूर्ण देशाचा व्यवहार ठप्प पडला व या मजुरांच्या हातचे काम गेले. हाल अपेष्टा सहन करत या मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. त्यानंतर सरकारी व्यवस्था करून या मजुकरांना त्यांच्या गावी पोहचवण्यात आले. तेव्हा लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मजुरांचे लोंढे मुंबईतून निघत होते. मुरांचे जत्थेच्या जत्थे त्यांच्यागावाकडे निघताना पाहून सामान्यांनाही आश्चर्य वाटावे इतके मजूर एकट्या महाराष्ट्रात असल्याचे आढळून आले. मजुर त्यांच्या राज्यात परतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीय मजुरांची यापूढे सरकारने नोंद ठेवावी अशी आग्रंही मागणी केली होती. राज ठाकरेंच्या या मागणीची सर्वोच्च न्यालयानेही दखल घेतली आहे. यावरून मनसेने राज ठाकरेंचे अभिनंदन करत दूरदृष्टी दाखवणारा एकमेव नेता असे म्हटले आहे.

फेसबूकवर मनसे अधिकृत पेजवर ही पोस्ट टाकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER