जामीन मंजूर, आता मिसळचा आस्वाद घेत राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसोबत मोर्चेबांधणी

ठाणे : नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे यांनी ठाणे शहरात प्रवेश करताच मनसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर येत असल्याने राज ठाकरे यांनी याचा राजकीय दौराही करण्याचे ठरवले आहे.

राज ठाकरे यांनाजामीन मंजूर झाला असून ते आता मनसैनिकांशी निवांत गप्पा मारणार आहे. लवकरच होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ते मनसैनिकांचे मत जाणून घेणार आहे. यासाठी ते ठाण्यातील प्रसिद्ध मामलेतदार मिसळच्या दुकानात जाणार आहेत.यावेळी ते नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील रणनीती आखत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पुत्र अमित ठाकरेहेही असणार आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER