सरकारनं अफू घेऊन पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घेतला का?; मनसेचा खोचक सवाल

mns-raise-question-on-pune-lockdown

पुणे : कोरोनाचा(Coronavirus) वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने आज मध्यरात्रीपासून पुण्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारनं अफू घेऊन पुण्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला का? असा खोचक सवाल मनसेकडून केला गेला आहे. मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी याबाबत मनसेची अधिकृत भूमिका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

मनसेने म्हटलं आहे की , उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) यांनी आज मध्यरात्रीपासून पुणे लॉकडाऊन (Lockdown)करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सरकार किती गोंधळलेले आहे हे उघड होते. राज्याचे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाही. घरातूनच परिस्थिती हाताळत आहेत की, सरकार नक्की कोण चालवत आहे? हे कोणालाच कळत नाही. कोरोनाच्या संकटकाळात बदल्यातील वर्चस्वाचे नाट्य आणि नगरसेवकांची देवाणघेवाण करण्यात सरकारमधील प्रमुख पक्ष व्यस्त आहेत. अशावेळी राज्यातील प्रमुख शहरतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे राज्यकर्त्यांचे लक्षच नव्हते. पुणे शहरात रोज सरासरी २० मृत्यू आणि रोज ६०० ते १००० रुग्ण वाढ होत आहे. असं असताना सरकार नेमकं कशाच्या अमलाखाली झोपलं होतं का?, असा सवाल मनसेने केला.

ही बातमी पण वाचा : चीनवरून भारतात येणारी व्यापारी जहाजे थांबली नाही तर, मनसे रस्त्यावर उतरेल

मनसेने(MNS) आपल्या निवदेनात लॉकडाऊनवर सडकून टीका केली. मनसेने म्हटलं, कोरोना संपलाच आहे अशा थाटात लॉकडाऊन काढून सत्ताधाऱ्यांनी सगळं शहर मैदान खुलं केलं. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना वाढती गर्दी कमी करण्याऐवजी स्थानिक कार्यकर्ते वेगळ्याच कारवाईत गुंग होते. रस्त्यावर थुंकल्याने कोरोना वाढेल असं सांगत थुंकणाऱ्यांवर १००० रुपये दंड केला जात होता. त्याचवेळी पानपट्ट्यांमधून खुलेआम गुटखा विक्री होत होती. गर्दी करु नका असं सांगताना चहाचे ठेले सर्व ठिकाणी सुरु होते. यासारखे अनेक प्रकार शहरात सुरु राहिल्याने गर्दीत वाढ होत राहिली. ही वाढ कोरोनात रुपांतरीत होत होती.”

शहरातील रुग्णांना रुग्णालयात जागा मिळत नाही. व्हेंटिलेटर मिळणं मुश्किल झालं असताना सत्ताधारी कशाच्या धुंधित होते? हा लॉकडाऊन जनतेला आर्थिक अडचणीत आणणारा आहे. व्यावसायिक तर लॉकडाऊनमुळे हवालदिल होतील आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार त्यापेक्षा अधिक अडचणीत येतील, असंही मनसेने या निवेदनात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER