मग मधले दलाल कशासाठी? लस खरेदीवरून मुंबई महापालिकेला मनसेचा सवाल

MNS questions Mumbai Municipal Corporation

मुंबई : मुंबईत मोठ्याप्रमाणात लसीकरण (Vaccination) व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले. मात्र लस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी अद्याप महापालिकेला अपेक्षित कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यातच हिंदुस्थानात स्पुटनिक लस आयात करण्याची परवानगी केवळ हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या एकमेव कंपनीला देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या दोन ते तीन दिवसांत ग्लोबल टेंडरबाबत अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती बुधवारी पालिका प्रशासनाने दिली. दरम्यान, याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला खोचक सवाल केला आहे.

मुंबई महानगर पालिकेने ग्लोबल टेंडर काढले आहे. मात्र या टेंडरला केवळ ८ ते ९ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. हे कंत्राटदार डॉक्टर रेड्डीज लॅबमधून लस खरेदी करतील आणि मुंबई महापालिकेला पुरवठा करती. मग मुंबई महापालिका थेट रेड्डीजकडून लस का खरेदी करत नाही? मधले दलाल कशासाठी? असा प्रश्न मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button