मनसेने काढली वारिस पठाणची अंतयात्रा

MNS protest against Waris Pathan in Aurangabad

औरंगाबाद : एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांची अंतयात्रा शुक्रवारी (दि.२१) काढण्यात आली होती. तसेच औरंगाबाद शहरात येण्यास वारिस पठाण यांना बंदी घालण्यात यावी, धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली आहे.

उस्मानपुरा येथून क्रांतीचौकापर्यंत एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांची अंतयात्रा काढण्यात आली होती. यावेळी मनसेचे जेष्ठ नेते प्रकाश महाजन, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राजु जावळीकर, अशोक पवार, मंगेश साळवे, संतोष कुटे, रितेश देवरे, गजानन गोमटे, प्रतिक गायकवाड, अविनाश पोफळे, हेमंत जोजारे, निखीत ताकवाले, शुभम घोरपडे, राजेश धुरट, बाबुराव जाधव, रमेश पाटील, शेखर नागरे, किशोर मंत्री, शुभम नवले आदींची यावेळी उपस्थिती होती.

…तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! मनसेचा वारीस पठाण यांना इशारा